जय महाराष्ट्र
ज्या मातीत ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकारामांसारखे, संत जन्मले;
शिवरायांसारखे राजे घडले;
ज्या मातीने टिळक, वासुदेव बळवंत फडके, विनोबांसारखे स्वातंत्र्यवीर पोसले;
आंबेडकर, कर्वे, फुलेंसारखे विचारवंत दिले;
आनंदीबाई जोशी, बयाबाई कर्वे, सावित्रीबाई फुलेंसारख्या धीरांगना दील्या;
बहिणाबाई, नारायण सुर्वेंसारख्या कविंचे लाड पुरवले,
साठे, अमरशेखांसारख्या शाहीरांना प्रेरित केलं;
किर्लोस्करांसारखे उद्योगपती घडवले;
आणी जीथे अनेक लेखक, कवि, चित्रकार, नटवर्य, कितीकांनी मराठी संस्कृतिला घडवण्याचं, नटवण्याचं कार्य अप्रतिमपणे केलं;
याच आपल्या तांबड्या – काळ्या मातीत इथल्या शेतकर्यांनी, कष्टकर्यांनी, कामगारांनी आपला घामच नाही तर रक्तही सांडलं आहे.
आणी आजही अनेकांना अर्धपोटी जीव जाळत आपलं मराठीपण सांभाळावं लागतंय.
आज मराठी माणसाला मराठी असण्याचा अभिमान तेंव्हाच करता येईल जेव्हा प्रत्येक कष्टकरी, सुदृढ, सशक्त, सबल, सुंदर, आयुष्य जगु शकत असेल.
जेव्हा प्रत्येक मराठी बालक फुकट शिक्षण, सकस अन्न, सुरक्षितता अनुभवु शकेल,
जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती जाती, धर्म वा प्रांत म्हणुन नाही तर मनुष्य म्हणुन स्वतःची ओळख सांगेल.
आज आपल्याला गर्व नको मराठी असण्याचा!
जबाबदारी हवी आपल्या माणसांना हात देण्याची.
जेव्हा प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होते, तेव्हाच आपला प्रांत, देश, आपलं जग आत्मनिर्भर होतं.
जय महाराष्ट्र ✊
कष्टकर्यांचा, कामगारांचा, शेतकर्यांचा विजय असो ॥
You must be logged in to post a comment.