माय!!!!!!
शब्दातच किती जिव्हाळा आहे।
अगदी नाळेने जोडलेला शब्द।
माय जिवंत असो नसो, देखिली असो नसो,
जगाच्या दृष्टीने बरी किंवा वाईट असो,
जवळ वा दूर परदेशी असो,
माझी वा तुझी, तीची, त्याची असो,
नुसत्या या शब्दात भरुन असते।
जो ऐकताच उर दाटून येतो, डोळे भरुन जातो।
ज्या शब्दाशी जोडला जातो,
त्याला माझं अस्तित्व जोडतो।
माय,
जीच्यात दिसते तीला माय माऊली बनवते।
जीथे वास करते ती जमीन मायभुमी करते।
ती जी भाषा बोलते ती मायबोली होते।
पहिल्या बोलातून उमटते, उमजते, व्यक्त होते, अस्वस्थ करते, कविता होते, शांत होते, शांत करते,
ती तीच माझी मायमराठी असते।
आजच्या दिवशीच नव्हे
तर शेवटच्या रामपर्यंत
माझी मायबोली मायमराठी, मराठीच असते.
You must be logged in to post a comment.